आधी बाईकची चोरी नंतर महिलांच्या सोनसाखळीवर डल्ला

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दिवसागणिक सोनसाखळी चोरांचा उपद्रव वाढला होता. सोनसाखळी चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आधी बाईकची चोरी करुन याचाच वापर करून वृद्ध महिला गाठून चोरी करण्याचा फंडा चोरट्यांनी चालवला होता.

Updated: Aug 20, 2015, 01:23 PM IST
आधी बाईकची चोरी नंतर महिलांच्या सोनसाखळीवर डल्ला title=

पुणे : पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दिवसागणिक सोनसाखळी चोरांचा उपद्रव वाढला होता. सोनसाखळी चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आधी बाईकची चोरी करुन याचाच वापर करून वृद्ध महिला गाठून चोरी करण्याचा फंडा चोरट्यांनी चालवला होता.

बाईकची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी बनावट चावीचा वापर केल्याचे पुढे आले आहे. बाईकची चोरी करुन शहरातील महत्वाची ठिकाणांची पाहणी करायची. यावेळी शहरात विविध ठिकाणी प्रामुख्याने वृद्ध महिला हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार व्हायचे, असा या चोरट्यांचा धुमाकूळ सुरु होता.

तसेच कोणी चोरांचा पाठलाग केल्यास त्याला अडथळा करण्यासाठी वेगळीच यंत्रणा कार्यरत ठेवायची. शहरात चोऱ्या कणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकविण्याचे अनेक प्रकार घडले होते. 

जितेंद्र ऊर्फ राहुल ज्ञानेश्वर रावडे (३०, रा. दांडेकर पूल, पुणे), किरण ऊर्फ खन्ना चंद्रकांत कुंभार (२२, रा. खानापूर, ता. हवेली), आतीश प्रकाश बाईत (२१, रा. मीठानगर, कोंढवा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत सोनसाखळी चोरीतील गुन्ह्य़ांचा उलगडा झाला. 

हे चोरटे वृद्ध महिलांना लक्ष करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसका मारून तोडून नेल्याचे व त्यासाठी प्रसंगी संबंधित महिलेला खाली पाडून दागिने हिसकावल्याचा प्रकार समोर आला होता. डेक्कन, कोथरूड, दत्तवाडी, वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, अलंकार, विश्रांतवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांनी चोऱ्या केल्याची कबुली दिली. 

चोरलेले दागिने आणि मोटारसायकली अशा एकूण २१ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. चोरलेले दागिने आरोपींकडून सराफ किंवा कोणाला कमी दरामध्ये विकले जातात. काही वेळेला ते वितळविण्यातही येत असतात. यापूर्वी पकडलेल्या आरोपींकडूनही हे सर्व प्रकार स्पष्ट झाले आहेत. याचा तपास पोलीस करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.