सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री

मोहोळमध्ये  राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम समर्थक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमचक्री सुरु झाली. जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

Updated: Jul 4, 2015, 03:17 PM IST
सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री title=

सोलापूर : मोहोळमध्ये  राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम समर्थक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमचक्री सुरु झाली. जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

हायवे अॅथोरीटीचे तारेचे कुंपन काढल्याच्या वादातून राष्ट्रवादी आमदार रमेश कदम यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात अटक होण्यासाठी आमदार कदम आपल्या समर्थकसह मोहोळ पोलीस चौकीत हजार झाले होते. पोलिसांनी आमदारांना अटक केली, अशी माहिती मिळताच मोहोळ शहरात खूप मोठा जमाव जमा झाला आणि पोलीस ठाण्यावर दगडफेक सुरु केली.

जमावाच्या दगड फेकीला प्रतीउत्तर म्हणून पोलिसांनी मोठ्या ताकतीने लाठीमार सुरु केला. सध्या पोलीस आणि आमदार समर्थक यांच्या धुमाचाक्री चालू होती. जमावाला पांगविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.