लवकरच, मुंबई ते अलिबाग रेल्वेमार्गानं जोडणार!

अलिबागकरांसाठी आनंदाची बातमी आहे... मुंबई ते अलिबाग मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेननं जोडलं जाणार आहे.

Updated: Feb 1, 2015, 07:18 PM IST
लवकरच, मुंबई ते अलिबाग रेल्वेमार्गानं जोडणार! title=

मुंबई : अलिबागकरांसाठी आनंदाची बातमी आहे... मुंबई ते अलिबाग मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेननं जोडलं जाणार आहे.

अवजड उद्योग मंत्रालयानं मुंबई ते अलिबाग हा प्रवास सुकर व्हावा, या हेतूनं हा मार्ग मध्य रेल्वेनं जोडण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडे सोपवला आहे. अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी याबाबत माहिती दिली. 

मुंबई ते अलिबाग रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी ३३८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातच, २८ कोटींचा नवीन मार्ग टाकला जाणार आहे. 

दरम्यान, पेण ते अलिबाग नवीन रेल्वे लाईन टाकली जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री गिते यांनी दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.