नागपूर: शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणा-या महावेध प्रकल्पाचं मुख्यंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त होणा-या हवामान विषयक माहितीमध्ये अचूकता येणार आहे. त्याचा उपयोग पीक विमा योजना, हवामान आधारित पीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला आणि मार्गदर्शन, कृषी संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सर्व 2 हजार 65 महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातल्या डोंगरगाव या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.