...म्हणून चिमुकल्यांची चपलांचा हार घालून धिंड काढली!

जेमतेम आठ नऊ वर्षांची ती कोवळी मुलं... त्यांचे अर्धे केस कापले, चपलांचा हार घातला आणि त्यांची परिसरात धिंड काढली. याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली... हा सारा प्रकार घडलाय उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाचमध्ये... या चिमुकल्यांना येवढा मोठा मानसिक धक्का दिला गेला तो फक्त एका चकलीसाठी...

Updated: May 21, 2017, 12:43 PM IST
...म्हणून चिमुकल्यांची चपलांचा हार घालून धिंड काढली! title=

उल्हासनगर : जेमतेम आठ नऊ वर्षांची ती कोवळी मुलं... त्यांचे अर्धे केस कापले, चपलांचा हार घातला आणि त्यांची परिसरात धिंड काढली. याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली... हा सारा प्रकार घडलाय उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाचमध्ये... या चिमुकल्यांना येवढा मोठा मानसिक धक्का दिला गेला तो फक्त एका चकलीसाठी...

चकली चोरली म्हणून आपण फारफार तर मुलांना ओरडू... पण उल्हासनगरच्या इरफान आणि तबलक पठाण या दोघा भावांनी शेजारच्या चिमुकल्यांना भयंकर त्रास दिला. आपल्या दुकानातली चकली या मुलांनी चोरली म्हणून त्यांचे अर्धे केस कापले, नंतर त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्यांची विवस्त्र धिंड काढली.

एवढ्यावरच पठाण बंधु थांबले नाही तर याची व्हिडिओ क्लिप करून त्यांनी ती व्हायरलही करुन टाकली. कामावरून परतल्यावर हा सारा प्रकार कळताच पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हिललाईन पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात 'पोक्सा' अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 

फक्त चकली चोरली म्हणून चिमुकल्यांना येवढी मोठी शिक्षा देणं शिवाय त्याची व्हिडिओ क्लिप करून ती व्हायरलही करणं.... हा प्रकार पाहता समाज नेमका कुठल्या दिशेनं जातोय त्याचा विचार करावा लागणार आहे.