रत्नागिरी : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना भाजपला चिमटे काढलेत. राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुपचूप मातोश्रीवर जात असल्याचं म्हंटलंय.
मातोश्रीवर मुख्यमंत्री काँम्प्रोमाईज करण्यासाठी जात असल्याचा राणेंनी आरोप केलाय. सेना भाजपचं सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करणार कारण सेना आणि भाजपवाले खुपच चिकट आहेत असंही राणे म्हणालेत.. तर स्मार्ट सिटी, शिवजी स्मारकांसारख्या मुद्दयावरुनही राणेंनी सेना-भाजपचा चांगलाच समाचार घेतलाय.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण भूमिपुजन कार्यक्रमात राणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करत निमंत्रण दिल्यामुळं त्यांचे आभार मानले. तर रिफायनरीच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी, राणे यांनी यावेळी साधली.