अहमदनगर : शिर्डीतील साईमंदिरातील दानाचा रेकॉर्ड मोडला आहे. २०१५ मध्ये साईंच्या गंगाजळीत तब्बल २७० कोटी रुपये दान पडले आहे.
गेल्या वर्षांच्या २०१४ च्या तुलनेत तब्बल ५ कोटी रुपयांनी दानाची वाढ झाली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंत साईंच्या दानपेटीत २७० कोटी रुपये जमा झाले असून, यात ८ कोटी रुपये परदेशी चलनांचा समावेश आहे.
तब्बल कोट्यवधी भक्तांनी शिर्डीतील साईंचे दर्शन घेतलं असून, यात ३५ ते ४० देशातील भाविकांचा समावेश आहे. दरवर्षी शिर्डीत गर्दी आणि दानाचे नवीन विक्रम असतात.
साईबाबा संस्थानकडे आजमितीला १ हजार ५५० कोटींहून अधिक ठेवी, ३९० किलो सोनं, ४ हजार ५०० किलो चांदी आणि ७ कोटी ७० लाख रुपयांचे हिरे जमा झाले आहेत.