मुख्यमंत्र्यांनी केले कृष्णा घोडा यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन

जिल्हातील डहाणू रानशेत इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पालघरचे खासदार चिंतामण वणगा हे उपस्थित होते.

Updated: May 30, 2015, 11:47 AM IST
मुख्यमंत्र्यांनी केले कृष्णा घोडा यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन title=
आमदार कृष्णा घोडा यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालघर : जिल्हातील डहाणू रानशेत इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पालघरचे खासदार चिंतामण वणगा हे उपस्थित होते.

फडणवीस यांनी आमदार घोडा यांना श्रद्धांजली वाहली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत बांगल, पाललघरचे जिल्हा पोलीस अधिक्षक शारदा राऊत, जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, संपर्क प्रमुख केतन पाटील, भरत राजपूत आदी उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्याशी थेट संपर्क साध्यण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डहाणू दौरा केला.

निवडणूक जाहीर

दरम्यान, कृष्णा घोडा याच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर विधानसभेसाठी २७ जून रोजी पोटनिवडणूक होतेय.. या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केलाय.. २७ जून २०१५ रोजी सकाळी ठिक ८ वाजता ते संध्याकाळी ८ वाजेपर्यत मतदान होईल. तर मतमोजणी ३० जूनला होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.