रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरतीत अशीही बनवाबनवी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक भरतीमध्ये तीन उमेदवरांकडून बनावट कागदपत्रं सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 24, 2017, 11:09 PM IST
रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरतीत अशीही बनवाबनवी title=

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक भरतीमध्ये तीन उमेदवरांकडून बनावट कागदपत्रं सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या भरतीशी संबंधित कागदपत्रांची खातरजमा नव्यानं करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिली आहे. २०१५ मध्ये झालेल्या आरोग्य सेवक भरतीमध्ये, एकंदर ९ पदं सरळसेवेनं भरली गेली. तर ६ पदं खेळाडूंसाठी आरक्षित होती. मात्र खेळाडू कोट्यातल्या या पदांसाठी पात्र ठरलेल्या सांगली आणि कोल्हापूरमधल्या तीन महिला उमेदवारांची प्रमाणपत्रं बनावट असल्याचं उघड झालंय.

विशेष म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या कागदपत्रांची छाननी झाली, तेव्हा पुण्यातल्या क्रिडा संचलनालयाकडून हे उमेदवार पात्र असल्याचं पत्र आलं होतं. मात्र पुन्हा या सगळ्या प्रकाराची चौकशी झाल्यावर, पुण्यातल्या याच क्रीडा संचलनालयानं रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इमेल पाठवून ते तीन उमेदवार पात्र नसल्याचं कळवले. त्यानंतर हा भांडाफोड झाला.