गोवंश हत्याबंदीवरुन भाजपात दोन गट, आमदाराचाच विरोध

गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्या भाजपमध्येच, या मुद्यावरुन दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. 

Updated: Mar 11, 2016, 02:03 PM IST
गोवंश हत्याबंदीवरुन भाजपात दोन गट, आमदाराचाच विरोध title=

आष्टी : गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्या भाजपमध्येच, या मुद्यावरुन दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. 

भाजपचे आष्टीचे आमदार भीमराव धोंडे यांनी, गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध केलाय. दुष्काळामुळे म्हाताऱ्या बैलांना चारा देणं कठीण होऊन बसलंय. त्यातच गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे, म्हाताऱ्या बैलांना बाजारात विकताही येत नाही, असे ते म्हणालेत.

शिवाय बीफ स्वस्त असल्यामुळे, गरीबांचं ते अन्न आहे. मात्र नव्या कायद्यामुळे बीफ मिळू शकत नसल्याचं भीमराव धोंडेंनी म्हंटलंय. म्हणून व्यापक विचार करत, हा कायदा रद्द करण्याची मागीणी धोंडे यांनी विधानसभेत केली.