अॅट्रॉसिटी कायदा रद्दच करा : खासदार उदयनराजे

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. 

Updated: Sep 7, 2016, 06:36 PM IST
अॅट्रॉसिटी कायदा रद्दच करा : खासदार उदयनराजे title=

पुणे : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. 

उदयनराजे साताऱ्यात होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चातही सहभागी होणार आहेत. 

अॅट्रोसिटीच्या 90 टक्के केसेस बोगस असतात, अॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे, असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.  

कोण काय म्हणालं याच्याशी मला देणंघेणं नाही, असा टोलाही देखील यावेळी उदयनराजे य़ांनी शरद पवारांचं नाव न घेता लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केलेली नाही. त्या कायद्याचा गैरवापर होत असेल, तर शासकीय यंत्रणांनी त्यामध्ये लक्ष घालून गैरसमज दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

तसेच सवर्णच दलितांचा वापर करुन अॅट्रॉसिटीचा गैरवापर करतात, असंही माझ्या निदर्शनास आल्याचं पवार म्हणाले होते.