बुलडाणा: बुलडाण्यात बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासला जाईल अशी एक घटना घडलीय.
दारू पिण्यासाठी पत्नीनं पैसे न दिल्यामुळं एका निर्दयी पित्यानं स्वत:च्याच एक वर्षाच्या मुलाला गरम तव्यावर चटके दिले. बुलडाणा जिल्ह्यातल्या वाळुज एमआयडीसी परिक्षेत्रात ही धक्कादायक घटना घडलीय. पित्याच्या निर्दयीपणामुळं चिमुरड्याच्या पायाला गंभीर दुखापत झालीय. सुनील हिंमतराव भोसले असं या निर्दयी पित्याचं नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये.
सुनीलला आधीपासून दारुचं व्यसन होतं... तो पत्नी रुपालीला नेहमीच मारहाण करत होता. आता तर त्याची मजल पोटच्या गोळ्याला त्रास देण्यापर्यंत गेली. त्याच्या या निंदनीय क्रौर्याबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून व्यक्त होतेय.
पाहा हा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.