धुवांधार पावसामुळे अलिबागमध्ये पूल कोसळला

महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणातही पावसाचा चांगलाच जोर आहे. 

Updated: Sep 22, 2016, 01:28 PM IST
धुवांधार पावसामुळे अलिबागमध्ये पूल कोसळला title=

अलिबाग : महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणातही पावसाचा चांगलाच जोर आहे. 

पावसामुळे अलिबागमधील कोपरा गावाजवळील मोरी हा लहान पूल कोसळलाय. यामुळे अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक बंद झालीये. 

पूल कोसळल्यामुळे अनेक गावांचा रोहा शहराशी संपर्क तुटलाय. दरम्यान, पूल कोसळल्याची बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीये.