नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलाय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 23, 2017, 10:22 AM IST
नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला title=

शिर्डी : विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलाय. 

मेघा धर्मशाळेत कमलकिशोर झंवर यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यासाठी व-हाडी मंडळींनी शिर्डीतल्या धर्मशाळेत खोल्या घेतल्या होत्या.

लग्नविधीतील आहेराचा कार्यक्रम सुरु असताना नववधूचे दागिने घेण्यासाठी आले असता दागिन्यांची बॅग नसल्याचं उघड झालं. चोर साडेसात लाखांचे दागिने घेऊन पसार झाल्याचं समोर आलं. 

चोरट्यांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालंय. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेतायत.