पिंपरी चिंचवड : कडाक्याच्या भांडणात तरुण तरुणीची परस्परांकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. सपना सुरेश बले वय वर्ष २५ आणि पदमाकर साबळे वय वर्ष २४ अशी दोघांची नावे आहेत. शनिवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
भांडणाचा आवाज आल्याने नागरिकांनी दरवाजा तोडला तर दोघांच्या हातामध्ये रक्ताने भरलेले चाकू होते. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.