पुणे : पुण्यातील बोपखेल आंदोलनाची दुसरी बाजू समोर आलीय. पोलिसांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ 'झी मीडिया'च्या हाती लागलाय.
बोपखेल आंदोलन आणि मारहाण प्रकरणाची दुसरी गंभीर बाजू या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलीय. 21 मे रोजी या रस्त्यावरुन मोठी धुमच्छक्री झाली होती. तब्बल आठ दिवसांपासून हा रस्ता बंद होता आणि त्यालाच विरोध म्हणून बोपखेलच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर या आंदोलनाला मोठं हिंसक वळण लागल होतं.
ग्रामस्थांनी केलेल्या दगडफेकीच्या उत्तरादाखल पोलिसांनीही लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर केला होता. सकाळी 7 ते दुपारी दीड-दोन पर्यंत चाललेल्या सर्व हिंसेत 100 पेक्षा जास्त नागरिक तर 50 पेक्षा जास्त पोलीस आणि कर्मचारी जखमी झाले होते.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.