सांगली : सांगलीमध्ये आज झालेल्या भाजपाच्या सभेत एक वेगळंच आणि जनतेच्या मनात कुतूहल निर्माण करणारं चित्र पाहायला मिळालं.
सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे क्रमांक दोनचे नेते सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. इतकंच नाही तर त्यांनी गळ्यात चक्क भाजपाचा स्कार्फ घातला होता.
मित्रपक्षाचे नेते आणि मंत्री या नात्यानं मुख्यमंत्र्यांच्या बाजुची खुर्ची एकवेळ समजण्यासारखी आहे. पण दुसऱ्या पक्षातून प्रवेश देताना गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालण्याची सध्याची प्रचलित पद्धत असताना सदाभाऊंच्या गळ्यातला कमळाचा स्कार्फ सर्वांचच लक्ष वेधून घेत होता.
विशेषतः सागर खोतांच्या उमेदवारीवरून पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्याशी वाद झाला असताना सदाभाऊंची भाजपाशी वाढलेली ही जवळीक खूप काही सांगून जाणारी आहे.