पिंपरीत भाजप सर्वांचा शत्रू नंबर एक

शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने पिंपरी चिंचवडच राजकारण फिरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरु आहे

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 30, 2017, 12:22 AM IST
पिंपरीत भाजप सर्वांचा शत्रू नंबर एक title=

पिंपरी-चिंचवड : शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने पिंपरी चिंचवडच राजकारण फिरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरु आहे! भाजप हा राष्ट्रवादीचा नंबर १ चा शत्रू आहे आणि युती तुटल्यानंतर सेनेचा ही एक नंबर शत्रू झाला आहे. त्यामुळं भाजपला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी सेनेची छुपी युती होणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि सेनेचे श्रीरंग बारणे यांचं विळ्या भोपळ्याचं सख्य सर्वश्रृत आहे... या दोघांतल्या दुश्मनी मूळे युती होणार नाही हे उघड होतं... पण आता वरिष्ठ पातळीवरच युती तुटल्यानं सेनेचा सर्वाधिक राग भाजप वर आहे.

राष्ट्रवादीचा ही भाजप क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यातच सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची अजित पवार यांच्याशी चांगली मैत्री आहे. महापालिकेच्या अनेक कार्यक्रमात हे दोघे एकाच व्यासपीठावर आलेत.. आता दोघांचा शत्रू एकच आहे तो म्हणजे लक्ष्मण जगताप.. त्यामुळं सेना भाजपची छुपी होती होणार अशी जोरदार चर्चा शहरात सुरु आहे. स्वत: बारणे यांनी आणि सेना नेत्यांनी मात्र ते अमान्य केलंय.

 महापालिका निवडणुकीत शिवसेनेच सर्वाधिक लक्ष मुंबई वर आहे. इतर ठिकाणी सेना स्वबळावर लढत असली तरी त्यांचं मुख्य टार्गेट भाजपला फटका बसवणं हेच आहे. त्यामुळं उघड पणे नसली तरी छुप्या पद्धतीने शिव सेना राष्ट्रवादी भाजपला एकत्र टार्गेट करणार अशीच स्तिथी आहे.