आमची नजर भलतीच खराब!

रावसाहेब दानवे यांनी भाजपमधील इनकमिंग वर मार्मिक शैलीत भाष्य केलं आहे.

Updated: Jan 29, 2017, 08:48 PM IST
आमची नजर भलतीच खराब! title=

सांगली : रावसाहेब दानवे यांनी भाजपमधील इनकमिंग वर मार्मिक शैलीत भाष्य केलं आहे. आमची नजर भलतीच खराब आहे. आमच्या नजरेत जर कोण बसला, तरी आम्ही त्याला आमच्या फाश्यात अडकवतोच असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगलीत केलं आहे. त्याचवेळी भाजपा मध्ये वंश परंपरा चालवली जात नाही. भाजपा ही सर्व सामान्यांना न्याय देणारी पार्टी आहे असं सागंत घराणेशाहीवर दानवेंनी टीका केलीय.