पोलीस भरतीत पहिल्यांदाच बायोमेट्रिकचा वापर

रत्नागिरीमध्ये रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांसाठी भरती सध्या सुरू आहे. रत्नागिरीतल्या शिवाजी स्टेडियम आणि पोलीस परेड ग्राऊंडवर या भरतीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असून उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्याचं काम सुरूय. 

Updated: Mar 24, 2017, 11:14 PM IST
पोलीस भरतीत पहिल्यांदाच बायोमेट्रिकचा वापर title=

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांसाठी भरती सध्या सुरू आहे. रत्नागिरीतल्या शिवाजी स्टेडियम आणि पोलीस परेड ग्राऊंडवर या भरतीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असून उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्याचं काम सुरूय. 

रत्नागिरीसाठी 77 जागांसाठी तब्बल 8815 उमेदवारांनी अर्ज केलेत. यामध्ये 7797 पुरूष आणि 1018 महिलांचा समावेश आहे. गेल्यावर्षीच्या पोलीस भरतीमध्ये लेखी परिषेसाठी डमी उमेदवार बसवण्याचा प्रकार रत्नागिरी पोलिसांनी उघड केला होता. 

त्यामुळेच यावर्षी कुठलाही घोटाळा होवू नये म्हणून विशेष दखल रत्नागिरी पोलिसांकडून घेण्यात आलीय. उमेदवारांची ओळख ही आधारकार्डच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. 

प्रत्येक उमेदवाराचा प्रवेश बायमेट्रिक प्रणालीद्वारे निश्चित होण्यासाठी पोलीस दलाकडून विशेष सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात येतोय. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये अशा प्रणालीचा वापर करण्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे.