नागपूर : ज्येष्ठ दलित नेते रा.सू.गवई यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. रा.सू.गवई हे ८६ वर्षांचे होते. रा.सू गवई यांनी शनिवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला.
रा.सू. गवई यांनी केरळ आणि बिहारचं राज्यपालपद भूषवलं होतं. रा.सू.गवई यांच्यावर उद्या अमरावतीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रा. सू. गवई यांचे अंतिम दर्शन नागपूरच्या दीक्षा भूमीवर घेता येणार आहे.
रा.सू गवई यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.