अशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये काँग्रेसला बुहमत, नगराध्यक्ष अपक्ष?

भोकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसनं १८ पैकी १२ जागा जिंकल्यात. भोकरचं नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होतं. पण नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेत. त्याजागी एक भाजपचा तर दुसरा अपक्ष उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक नसणार हे स्पष्ट झालेय. मात्र, अपक्षाला आपल्या हाताला लावण्यासाठी मोर्चेबांधणी झाली आहे.

Updated: Apr 23, 2015, 10:33 PM IST
अशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये काँग्रेसला बुहमत, नगराध्यक्ष अपक्ष? title=

नांदेड : भोकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसनं १८ पैकी १२ जागा जिंकल्यात. भोकरचं नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होतं. पण नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेत. त्याजागी एक भाजपचा तर दुसरा अपक्ष उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक नसणार हे स्पष्ट झालेय. मात्र, अपक्षाला आपल्या हाताला लावण्यासाठी मोर्चेबांधणी झाली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीनं तीन, भाजपनं दोन तर अपक्षांनी दोन जागा जिंकल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसला बहुमत मिळाले . तीन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर दोन ठिकाणी भाजप आणि दोन जागा अपक्षांनी पटकावल्या आहेत. 
 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी भोकर मतदारसंघाच्या आमदार अमिता चव्हाण यांच्यामुळे भोकरची निवडणूक कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची होती. येथे भाजप-शिवेसना युती झाली होती; मात्र शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. 

भाजपने दोन जागा जिंकत पालिकेत पहिल्यादांच प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाचपेक्षा अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र या पक्षालाही तीनच जागांवर समाधान मानावे लागले

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.