तिरुपतीला गेलेल्या बारामतीच्या सात तरूणांचा अपघाती मृत्यू

बारामतीच्या ७ तरुणांचा आंध्रप्रदेशात मृत्यू झालाय. तिरुपतीला दर्शनासाठी जात असतांना कर्नुलजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. हे सर्व तरुण

Updated: May 25, 2015, 09:53 AM IST
तिरुपतीला गेलेल्या बारामतीच्या सात तरूणांचा अपघाती मृत्यू title=

पुणे/हैदराबाद : बारामतीच्या ७ तरुणांचा आंध्रप्रदेशात मृत्यू झालाय. तिरुपतीला दर्शनासाठी जात असतांना कर्नुलजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. हे सर्व तरुण

बारामतीजवळच्या देऊळगाव रसाळ, उंडवडी सुप्याचे रहिवाशी होते.
 
मृतांमध्ये बारामती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ यांचा मुलगा सागर रसाळ याचा समावेश आहे. या अपघातामुळं बारामतीवर शोककळा पसरली आहे.  

अपघातातील मृतांची नावं -

  • सागर  अंकुश  रसाळ
  • सागर  बाळासाहेब  रसाळ
  • अजित  रामचंद्र  रसाळ
  • अनिल  रमेश  गवळी
  • शेखर  बापूराव  गवळी
  • ऋषीकेश पोपट  गवळी
  • मोहन  दत्तात्रय  गवळी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.