जळगाव : गारपीट आणि वादळामुळे जिल्ह्यातील विटनेर येथील एका शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
वर्षभर घेतलेली मेहनत काही मिनिटांच्या वादळाने मातीमोल केली आहे.
केळीचे १० हजार खोडं जमीनदोस्त झाली आहेत, ऐन कापणीला आलेली केळी जमीनदोस्त झालीय.
बाबुराव गोलांडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्यांनी एकूण ७ लाखांचं कर्ज काढलंय, तसेच केळीची मशागत आणि खते आणि इतर बाबींसाठी त्यांना आतापर्यंत १० लाख रूपये खर्च आला आहे.
बाबुराव गोलांडे एक उदाहरण असलं तरी जळगाव जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
जिल्ह्यात मका, डाळींब, केळी, कापूस, कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
मात्र अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.