समुद्रातील शिवस्मारकाचं भूमीपूजन १९ फेब्रुवारीला

अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुप्रतिक्षित स्मारकाचं भूमीपूजन 19 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केलीये.

Updated: Dec 15, 2014, 05:46 PM IST
समुद्रातील शिवस्मारकाचं भूमीपूजन १९ फेब्रुवारीला title=

मुंबई : अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुप्रतिक्षित स्मारकाचं भूमीपूजन 19 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केलीये.

शिवस्मारकाच्या मार्गातील ज्या काही अडचणी असतील त्या तातडीनं दूर करण्यात येतील असं आश्वासनही त्यांनी विधानसभेत बोलताना दिलं. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची भेट घेऊन पर्यावरण खात्याची मंजुरी मिळवली होती. त्यामुळं स्मारकाच्या मार्गातला एक मोठा अडथळा यापूर्वीच दूर झालाय.

या व्यतिरिक्त मुंबई तसंच इतरही मुद्द्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाची घोषणा आज विधानसभेत केल्या आहेत.. 

  • मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही

  • मुंबई कोस्टल रोडला केंद्राची परवानगी, लवकरच कामाला सुरूवात

  • पोलीस, सफाई कामगारांना घरे, त्यासाठी जास्तीचा एफएसआय देणार

  • इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकासाठी प्रक्रिया पूर्ण करणार

  • गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे

  • पुणे आयटी हब करण्यासाठी धोरणात बदल

  • सीमाप्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा

  • जागतिक दर्जाचे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर औरंगाबादमध्ये

  • नागपूरला व्याघ्र राजधानी करणार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.