बालभारतीची 'बालबुद्धी'! त्याच चुका पुन्हा पुन्हा...

गेल्या वर्षी दहावीच्या पुस्तकात अरूणाचल प्रदेश चीनमध्ये दाखवणा-या आणि राष्ट्रगीतात अक्षम्य चुका करणाऱ्या बालभारतीनं यंदाही ती परंपरा न चुकता पाळलीय. बालभारतीनं पुस्तकं छापताना काय सावळागोंधळ घातलाय... पाहुयात... 

Updated: May 22, 2015, 04:09 PM IST
बालभारतीची 'बालबुद्धी'! त्याच चुका पुन्हा पुन्हा... title=

मुंबई : गेल्या वर्षी दहावीच्या पुस्तकात अरूणाचल प्रदेश चीनमध्ये दाखवणा-या आणि राष्ट्रगीतात अक्षम्य चुका करणाऱ्या बालभारतीनं यंदाही ती परंपरा न चुकता पाळलीय. बालभारतीनं पुस्तकं छापताना काय सावळागोंधळ घातलाय... पाहुयात... 

भारताच्या राष्ट्रगीतात अनेक चुका... मुंबईच्या नकाशात ७ ऐवजी १० बेटं... दोन नद्यांची दिशाच बदलली
कुणी केलाय हा भीमपराक्रम... माहीत आहे? उत्तर आहे बालभारती... बालभारतीनं यंदाची पुस्तकं छापताना पुन्हा एकदा आपल्या बालबुद्धीचा परिचय करून दिलाय. 

पाचवीचं परिसर अभ्यास भाग-१ चं पुस्तक.... सुरुवात होते राष्ट्रगीतापासून... 'सिंध'च्या ऐवजी 'सिन्धू' आणि 'आशिष मांगे' ऐवजी 'आशिस मागे'... असे शब्द राष्ट्रगीतात घुसडण्यात आलेत. याच पुस्तकातल्या पान क्र. ५६ वर तर बालभारतीनं भलतेच तारे तोडलेत. मुंबईची ७ बेटं असा नकाशा छापलाय. प्रत्यक्षात नकाशातली बेटं मोजली तर ती आहेत दहा... या बेटांची नावं लिहिण्याची तसदीही बालभारतीनं घेतलेली नाही. त्यामुळं मुंबईत ७ बेटं आहेत की १०, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला तर आश्चर्य वाटायला नको.

हे कमी झालं म्हणून की काय, 'आपण कसे घडलो' या पुस्तकात पान क्र. ४६ वर नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती यासंदर्भातील एक नकाशा छापण्यात आलाय. यात भूमध्य समुद्राजवळ टायग्रीस आणि युफ्रेटीस या नद्यांची दिशाच बदलण्यात आल्याचा दावा मुंबई भूगोल अध्यापक मंडळाचे विद्याधर अमृते यांनी केलाय.

पुस्तकातल्या या चुकांबाबत 'बालभारती'चे संचालक चिंतामणी बोरकर यांच्याशी आम्ही संपर्क साधला. मात्र, सरकारकडून जे राष्ट्रगीत येतं तेच आम्ही छापत असल्याचं सांगून त्यांनी फोन कट केला.

नव्याने छापण्यात येणाऱ्या पुस्तकांमध्ये बालभारतीकडून दरवर्षी विविध चुका होत असतात. एकदा पुस्तके छापली की नविन पुस्तके येईपर्यंत विद्यार्थी अशाच चुका असलेल्या पुस्तकातून अभ्यास करतात. त्यामुळे गेल्या पाचवर्षानॆतर शिसण मंञी बदलले पण बालभारतीच्या चुका काही सुधारत नाहीत, अशी चर्चा शिसण वर्तुळात रंगू लागलीय. त्यामुळे नविन शिसणमंञी यावर काही ठोस पाऊल उचलणार की त्यांनाही अशा चुकांची सवय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.