ठाणे : बदलापूर शहरात बेलवली इथे रेल्वे ट्रॅकखालून जाणा-या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात एक कारचालक अडकला. हा भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरला होता. तरीही उत्साही कार चालकाने शहाणपणा करीत कार पाण्यात घाल्याने त्याच्या जीवावरच बेतले. ग्रामस्थांनी धावाधाव करून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना ही कार पाण्यात अडकली. ६ महिन्यांपूर्वीच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस आणि एक वॅगन आर गाडीही अडकली होती. दुचाकीस्वार अडकण्याच्या घटना रोज घडतात. कोणतेही नियोजन न करता हा भुयारी मार्ग बांधल्याने इथे बाराही महिने पाणी भरलेलं असतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.