मुंबई : कल्याणमधून बेपत्ता झालेले चारही युवक इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेतच सहभागी झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यापैकी २ युवकांनी त्यांच्या घरी फोन केल्याची माहिती आहे.
आरीफ मोहम्मद आणि माजिद टांकी या दोन युवकांनी घरी फोन करून आपण इसिसमधून लढत असल्याची माहिती दिलीय. हे चौघेही सिरीयामधल्या रक्का या प्रांतात आहेत. तसंच अमन तांडेल आणि फहाद शेख हे उरलेले दोन तरूणही सिरीयातल्या रक्का इथेच असल्याची माहिती या दोघांनी दिलीय.
सिरीयात आपण सुरक्षित असल्याची माहिती या तरूणांनी दिली आहे. आपल्या या कृत्याने संपूर्ण कुटुंबाला स्वर्गप्राप्ती होईल अशी मुक्ताफळं या दोघांनी उधळली आहेत. दरम्यान आपण परत येणार नाही, पण कुटुंबीय सिरीयात येऊन त्यांना भेटू शकतात असंही हे तरूण म्हणाले आहेत. इराकमध्ये तिर्थयात्रेसाठी जाणा-या गटातून हे चौघेही तिथे गेले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.