मुख्यमंत्र्यांच्या शहरातही ISIS ची धडक; सीरियाला जाणाऱ्या तीन तरुणांना अटक

नागपूर विमानतळावर एटीएसकडून तीन तरुणांना अटक केली आहे. तिन्ही तरुण सीरियात जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Updated: Dec 26, 2015, 12:02 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या शहरातही ISIS ची धडक; सीरियाला जाणाऱ्या तीन तरुणांना अटक  title=

नागपूर : नागपूर विमानतळावर एटीएसकडून तीन तरुणांना अटक केली आहे. तिन्ही तरुण सीरियात जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
 
पकडलेल्या तरुणांना पुढील तपासासाठी आणि चौकशीसाठी हैदराबादला नेण्यात आलंय. अब्दुल वासिम,  उमर फारुखी आणि हसन फारुखी अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावं आहेत. हे तीनही तरुण हैदराबादचे रहिवाशी असून ते श्रीलंकेला जात होते. 

दरम्यान, आम्ही जम्मू-काश्मिरला जात होतो, असा दावा या तरुणांनी केलाय. इस्लामिक स्टेटमध्ये ते भरती होणार असल्याच्या संशयावर त्यांना अटक करण्यात आलीय.