अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या मरोली प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडून बंद पुकारण्यात आलाय.
या बंदातून अत्यावश्यक सेवा, शाळा आणि कॉलेजेसला मात्र वगळ्यात आलंय... शुक्रवारी सकाळी १० च्या सुमाराला अंबरनाथ मोरोली रस्त्याने बाईकवरून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी चॉपर आणि तलवारने गुंजाळ हल्ला चढविला. या प्राणघातक हल्ल्यात रमेश गुंजाळ यांचा मृत्यू झाला.
गुंजाळ यांच्या हत्येने अंबरनाथ परिसरात खळबळ माजली आहे. या हत्येमुळे गेले काही दिवसांपासून शांत असलेल्या अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा हत्या सत्र सुरु होतं की काय अशी अंबरनाथकरांना भीती वाटत आहे.