इंदापूरचा नवा आदर्श, शुद्ध पाणी चक्क एटीएम मशीनमधून

इंदापूर तालुक्यातल्या तक्रारवाडी गावानं एक अभिनव उपक्रम राबवलाय. ज्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यास मदत होतेय आणि पाण्याचा अपव्ययही टाळता आलाय. नेमकं काय केलंय या गावाचा एक रिपोर्ट.

Updated: Mar 19, 2015, 04:08 PM IST
इंदापूरचा नवा आदर्श, शुद्ध पाणी चक्क एटीएम मशीनमधून  title=

इंदापूर :इंदापूर तालुक्यातल्या तक्रारवाडी गावानं एक अभिनव उपक्रम राबवलाय. ज्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यास मदत होतेय आणि पाण्याचा अपव्ययही टाळता आलाय. नेमकं काय केलंय या गावाचा एक रिपोर्ट.

इंदापूर तालुक्यातल्या भिगवण जवळचं तक्रारवाडी गाव. गावाची लोकसंख्या जेमतेम अडीच हजार. जनीचा जलाशय गावाजवळच. मात्र उजनीचं पाणी दुषित असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केल्यामुळे ग्रामस्थांनी त्यावर एक उपाय शोधून काढलाय. गावानं लोकवर्गणीतून जलशुद्धीकरण यंत्र बसवलंय. या उपक्रमात त्यांनी शुद्ध पाणी चक्क एटीएम मशीनमधून देण्यास सुरुवात केलीय. बघता बघता हा प्रयोग यशस्वीही झालाय. 

एटीएमद्वारे गावक-यांना २५ पैसे लिटर दरानं शुद्ध पाणी मिळतं. त्यासाठी प्रत्येक गावक-याला एक कार्ड देण्यात आलंय. हे कार्ड प्रीपेड असून त्यासाठी आधीच पैसे भरावे लागतात. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा त्रासही वाचलाय. 

ग्रामीण भागात राबवण्यात आलेला‘वॉटर एटीएम’चा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी होत असल्यानं आता सर्वच गावात हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न शासन करणार असल्याचं गटविकास अधिकारी सांगतात. आरोग्य तंदुरुस्त रहावं यासाठी तक्रारवाडीचे गावकरी राबवत असलेला वॉटर एटीएमचा हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.