कैलास पुरी, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधळ्या बोपखेलवासियांसाठी लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातला बोपखेल ते दापोडी हा रस्ता बंदच राहणार हे स्पष्ट झालंय. या मुद्द्यावर आज संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, जिल्हाधिकारी सौरभ राव, पिंपरी चिंचवड आयुक्त राजीव जाधव, लष्कराचे अधिकारी आणि स्थानिक नेत्यांची पुण्यात बैठक झाली.
त्यात कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. पण लष्कराने मुळा नदीवर बांधलेल्या पर्यायी पुलानंतर कच्चा रस्त्याचं डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेला लष्कर लगेच परवानगी देणार आहे. त्यामुळे बोपखेलवासियांसाठी आता बोपखेल खडकी हा पर्यायी रस्ता असणार आहे.
कायम स्वरूपी कोणता रस्ता असेल याचा निर्णय पर्रिकर घेणार आहेत. बोपखेलवासियांसाठी आता कोणते नेमके पर्याय आहेत, बोपखेल दापोडी रस्ता कसा आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.