'स्त्रियांनी मॅक्सी घातल्यास ५०० रुपयांचा दंड'

महिलांनी काय परिधान करावं किंवा काय परिधान करू नये, यावरून आत्तापर्यंत बिहारमध्ये खाप पंचायतीनं काढलेले फतवे चर्चेत येत होते.  मात्र, असे फतवे आता शहरांमध्येही दिसू लागलेत.

Updated: Dec 9, 2014, 02:54 PM IST
'स्त्रियांनी मॅक्सी घातल्यास ५०० रुपयांचा दंड' title=

मुंबई : महिलांनी काय परिधान करावं किंवा काय परिधान करू नये, यावरून आत्तापर्यंत बिहारमध्ये खाप पंचायतीनं काढलेले फतवे चर्चेत येत होते.  मात्र, असे फतवे आता शहरांमध्येही दिसू लागलेत.

बरं, स्त्रियांसाठी हे फतवे कोणत्या पुरुष संघटनेनं नाही तर एका महिला मंडळानं काढलेत... हा फतवा आहे महिलांच्या पेहरावाबाबत आणि तो काढलाय नवी मुंबईतल्या गोठवली गावातील इंद्रायणी महिला मंडळाने... 

या मंडळानं जाहीर केलेल्या सूचनेनुसार, महिलांनी घराबाहेर मॅक्सी घालून फिरू नये.  इतकंच नाही तर, कुणी महिला मॅक्सीत आढळल्यास तिच्याकडून ५०० रुपये दंडही आकारण्याचा इशारा या संघटनेनं दिलाय. 

महिलांबाबत होत असलेल्या दुर्घटना रोखण्यासाठी तसंच सभ्यता जपण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं, इंद्रायणी महिला मंडळाच्या सदस्या लक्ष्मी पाटील सांगतायत.

काही स्थानिकांनी याला विरोध केला असून हा निर्णय सध्या व्हॉटसअपवरही फिरतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.