आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला

सिंधुदुर्ग जिल्हयातली प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे. 

Updated: Dec 23, 2015, 04:06 PM IST
आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला title=

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हयातली प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे. 

यात्रेचा दिवस निश्चित करण्यासाठी गावाची आपली पद्धत आहे. त्यासाठी गाव पारध केली जाते. ही गाव पारध झाल्यावर आज यात्रेची तारीख निश्चित होते. यंदा २५ फेब्रुवारीला यात्रा होईल, हे गृहीत धरून अनेकांनी रेल्वेची बुकिंग केली होती. त्यांची निराशा झाली नाही. 

आंगणेवाडीची यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिथं दरवर्षी भाविकांच्या उपस्थितीचा उच्चांक होत असतो. यंदाही दहा लाखांपेक्षा जास्त  भाविक येतील, अशी शक्यता आहे.