आयत्या बॅगेत विषारी नागोबा...

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील जिल्हा  परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तरात चक्क विषारी नाग निघाल्यानं एकच खळबळ उडाली. 

Updated: Jul 25, 2016, 07:55 PM IST
आयत्या बॅगेत विषारी नागोबा... title=

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील जिल्हा  परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तरात चक्क विषारी नाग निघाल्यानं एकच खळबळ उडाली. 

मेळघाटातल्या चिखलदरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या बदनापूरला जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी वर्गात बसले होते. 

दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या राजा धांडे या विद्यार्थाच्या दप्तरात काही तरी गेल्याचे बाजूला बसलेल्या विद्यार्थ्याने सांगितलं. शिक्षकांनी काठीने दप्तर तपासलं. त्यावेळी 3 ते 4 फूट लांबीचा विषारी कोब्रा साप दिसताच, सर्वांचा थरकाप उडला.

राजाने पुस्तके काढण्यासाठी जर दप्तरात हात घातला असता तर तर मोठा अनर्थ घडला असता. शिक्षकांनी राजाचे दफ्तर काठीच्या सहाय्यानं बाहेर नेलं आणि साप निघून गेला.

पाहा व्हिडिओ