अकोला : अकोला किडनी रॅकेटची पाळंमूळं चांगलीच खोलवर गेल्याचं समोर आलंय. आणखी तीन जणांची किडनी विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तर आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिलीय. त्यामुळं पीडितांचा आकडा पाचवर गेला असून एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजून किती जण या रॅकेटचे बळी ठरले आहेत असा सवाल निर्माण झालाय.
पोलिसांची विशेष पाच पथकं तपास करत असून अजून काय धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे लक्ष लागलंय. मात्र या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्याची उकल होणार का असे प्रश्न आथा उपस्थित होत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.