अकोल्यात विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी तिघांना अटक

अकोल्यातील नवोदय विद्यालयातील ५५ मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी तीन शिक्षकांना अटक करण्यात आलीये. राजन गजभिये, शैलेश रामटेके या दोघांना नागपूरातून तर संदिप लाडखेडकर याला अकोल्यातून अटक करण्यात आलीये. अकोला पोलिसांनी काल रात्री या तिघांना अटक केली. 

Updated: Apr 4, 2015, 03:17 PM IST
अकोल्यात विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी तिघांना अटक title=

अकोला: अकोल्यातील नवोदय विद्यालयातील ५५ मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी तीन शिक्षकांना अटक करण्यात आलीये. राजन गजभिये, शैलेश रामटेके या दोघांना नागपूरातून तर संदिप लाडखेडकर याला अकोल्यातून अटक करण्यात आलीये. अकोला पोलिसांनी काल रात्री या तिघांना अटक केली. 

दरम्यान विद्यार्थिनींनी प्राचार्यांकडे तक्रार करुनही त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचं सूचित होत आहे. प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन गेली ४ वर्ष राजन गजभिये आणि शैलेश रामटेके हे दोघंही मुलींवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे.
 
२० मार्चला याची तक्रार एका मुलीनं राज्य महिला आयोग आणि शाळेकडे केली होती. मात्र राजकीय दबाव वापरुन २५ मार्चला ही तक्रार मागे घेण्यात आली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी चौकशी करुन पोलिसात तक्रार दिली आहे. नवोदयसारख्या निवासी आणि हायप्रोफाईल शाळेत मुलींचा छळ झाल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.