नेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून कुख्यात गुंड पळाला

अहमदनगरच्या नेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून एका कुख्यात गुंडानं पलायन केलंय. सोपान गाडे असं या फरार आरोपीचं नाव आहे.

Updated: Jul 22, 2015, 03:31 PM IST
नेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून कुख्यात गुंड पळाला title=

अहमदनगर: अहमदनगरच्या नेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून एका कुख्यात गुंडानं पलायन केलंय. सोपान गाडे असं या फरार आरोपीचं नाव आहे.

नगरमधील बस स्थानकातून त्यानं पलायन केलंय. सोपान गाडे हा कलम ३०२ मधील आरोपी आहे. मंगळवारी नेवासा न्यायालयात सोपानला आणण्यात आलं होतं.. तिथून रात्री पुणे इथल्या येरवाडा जेलमध्ये नेत असतांना तो पोलिसांच्या ताब्यातून पसार झालाय.  

यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.