नाशिक : राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्या भूमिकेमुळे लवकरच शेतक-यांची अडत्यांच्या आडकित्त्यातून सुटका होणार आहे. मात्र, आडत पद्धत बंद करण्याच्या सुभाष माने यांच्या निर्णयाला नाशिकमधील कांदा व्यापा-यांनी विरोध केलाय.
आजपासून कांदा खरेदी-विक्री बंद करण्याचा इशारा व्यापा-यांनी दिलाय. तसेच संपूर्ण शेतीमाल खरेदी बंद करण्याचा इशाराच व्यापा-यांनी दिलाय.
शेतक-यांची अडत्यांच्या आडकित्त्यातून सुटका करण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुरु असलेली आडत पद्धत लवकरच बंद करणार असल्याची माहिती सुभाष माने यांनी दिली. तसं परीपत्रक त्यांनी काढलंय होतं.
सोलापूरातील बार्शी मध्ये एका खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उद्घाटनाच्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. स्पर्धा असेल तर न्याय मिळतोच असंहे ते यावेळी म्हणाले.
राज्यात सहकारी कृषी उत्पन्न समितीच्या स्पर्धेला खासगी बाजार समिती आल्याने शेतकऱ्याच्या शेतमालास चांगला दर मिळेल. त्यामुळे आगामी काळात खाजगी बाजार समित्या स्थापन झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.