अॅम्बी व्हॅलीला दणका, ऑफीससह गेट सील

पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील सहाराच्या अॅम्बी व्हॅलीच्या कार्यालयाला आणि मुख्य दरवाज्याला मुळशी तहसीलदार कार्यालयाने सील ठोकले.

Updated: Mar 1, 2016, 01:50 PM IST
अॅम्बी व्हॅलीला दणका, ऑफीससह गेट सील title=

लोणावळा : पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील सहाराच्या अॅम्बी व्हॅलीच्या कार्यालयाला आणि मुख्य दरवाज्याला मुळशी तहसीलदार कार्यालयाने सील ठोकले.

नॉन अॅग्रीकल्चर (एनए) जमीन प्रकरणी ४ कोटी ८२ लाख ६१ हजार ४७० रुपयांचा महसूल भरला नसल्याने अॅम्बी व्हॅलीच्या कार्यालयाला आणि मुख्य गेटला सील ठोकले. ही कारवाई आज सकाळी मुळशी तहसीलकडून करण्यात आली.