कंटेनरनं बसला २० फूट फरपटत नेलं, सात ठार ४४ जखमी

धुळे जिल्ह्यातील शेवाळी फाट्याजवळ एसटी बस आणि कंटनेरच्या धडकेत ७ ठार तर ४४ प्रवासी जखमी झालेत. मृतांमध्ये तीन महिला, एक मुलगी, एक मुलगा आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

Updated: Jul 9, 2016, 08:40 AM IST
कंटेनरनं बसला २० फूट फरपटत नेलं, सात ठार ४४ जखमी title=

धुळे : धुळे जिल्ह्यातील शेवाळी फाट्याजवळ एसटी बस आणि कंटनेरच्या धडकेत ७ ठार तर ४४ प्रवासी जखमी झालेत. मृतांमध्ये तीन महिला, एक मुलगी, एक मुलगा आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

सुरत - नागपूर महामार्गावर शेवाळी फाट्याजवळ शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडलीय. साक्रीहून धुळ्याकडे येणाऱ्या एसटी बसवर कंटेनर चालकाच्या बाजूने धडकला.

यामुळं बसचा पत्रा कापला गेल्यानं प्रवासी जखमी झालेत. दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.

जखमींना लगेचच नजिकच्या साक्री इथल्या ग्रामीण रुगणालयात तर काहींना धुळ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. अजूनही अकरा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर बसला तब्बल १५ ते २० फूट फरफटत घेऊन गेला. या महामार्गावर पंधरवड्यातला हा दुसरा भीषण अपघात आहे. या दोन्ही अपघातात २३ जणांना आपले जीव गमवावे लागले आहे.