इंदापूर : आज कार्तिकी एकादशी... लाखो वैष्णव भाविक या दिवशी उपवास करतात.. रताळं हे कंद उपासासाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं..
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अजब गजब ऱताळे इंदापूरातून.. इंदापूर तालुक्यातील सराडेवाडी येथे तात्यासाहेब हंबिरे या शेतक-यानं आपल्या शेतात तब्बल नऊ किलो वजनी रताळ्याचं उत्पन्न घेतलंय...
चार महिन्यांपूर्वी हंबिरे यांनी एका शेतक-याकडून लागवडीसाठी रताळ्याचे वेल आणले. दोन दिवसांपूर्वी त्यांचं रताळ्याचं पीक काढणीला आलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला... कारण त्यांनी लावलेल्या वेलापासून त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल नऊ किलो वजनाची अगडबंब रताळी लागली होती..
त्यांच्या शेतातली ही अगडबंब रताळी पहाण्यासाठी पंचक्रोशीतले लोक गर्दी करत असले तरी आता ही रताळी विकायची कशी असा प्रश्न या तात्यासाहेब हंबिरे यांना पडलाय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.