नाशिक : गेल्या पाच वर्षांत महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या मनसेला राजकीय अनुभव असलेले उमेदवार मिळू शकलेले नाहीत. यंदा महापालिका निवडणुकीत घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये सुमारे ८५ टक्के चेहरे हे नवखे आहेत.
पाच वर्षांत चाळीस पैकी तीस नगरसेवक सोडून गेलेत. मनसेने शिल्लक दहापैकी आठ नगरसेवकांसह एका स्वीकृत नगरसेवकाला उमेदवारी बहाल केली आहे. तर दोन नगरसेवकांनी पुन्हा न लढण्याचे ठरविले आहे. एका अधिकृत उमेदवाराने माघार घेतली आहे. नवख्या लोकांना सोबत घेऊन महापालिका निवडणुकीला सामोरे जाणे हे पक्षासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.