नवी मुंबई : नवी मुंबईत येत्या सात वर्षात सिडको तब्बल पाच लाख स्वस्त घरे बांधणार आहे. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घर असतील सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ही माहिती दिलीय.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या महागाईचा परिणाम घरांच्या किंमतीवरही झालाय. सिडको प्रशासनाने घेतलेल्या स्वस्त घरांचा निर्णय त्यावर दिलासदायक ठरणार आहे.
मागील काही वर्षात सिडकोकडून मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी घरे बनविण्यात आली होती. शिवाय या घराचं दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. ही घरे सुद्धा एकाच उत्पन्न गटातल्या नागरिकांची गुंतवणूक होऊन बसलीत. त्यामुळे स्वस्त दरात घरे निर्माण करण्याचा सिडकोचा हेतूच पूर्ण होत नव्हता, असे राधा म्हणाल्यात.
यापुढे सिडको प्रशासन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जडणघडणीबरोबरच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे निर्माण करणार असल्याचं सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी सांगिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.