ठाणे मेट्रोतून तब्बल ४० हजार प्रवासी प्रवास करणार

वडाळा ते कासारवडवली मेट्रोला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. ठाण्यातील १२ जंक्शनवरुन २०० वातानुकूलीत बसमधून जेवढे प्रवासी प्रवास करु शकतात तेवढेच प्रवासी वडाळा- ठाणे दरम्यान मेट्रोतून प्रवास करु शकणार आहेत. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या सर्वेनुसार कामाच्या वेळेत जवळपास ४० हजार लोकं मेट्रोतून प्रवास करु शकणार आहेत. 

Updated: Jun 8, 2016, 11:43 AM IST
ठाणे मेट्रोतून तब्बल ४० हजार प्रवासी प्रवास करणार title=

ठाणे : वडाळा ते कासारवडवली मेट्रोला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. ठाण्यातील १२ जंक्शनवरुन २०० वातानुकूलीत बसमधून जेवढे प्रवासी प्रवास करु शकतात तेवढेच प्रवासी वडाळा- ठाणे दरम्यान मेट्रोतून प्रवास करु शकणार आहेत. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या सर्वेनुसार कामाच्या वेळेत जवळपास ४० हजार लोकं मेट्रोतून प्रवास करु शकणार आहेत. 

मेट्रोमुळे ठाण्यातील प्रवाशांचा मुंबईकडील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. तर लोकल लाईनवरील प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. अनेक वर्षे कागदावर रखडलेल्या या आराखड्याला नुकताच हिरवा कंदिल देण्यात आला आहे.

ठाण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे. मेट्रोमुळे तरी हा ताण कमी होईल अशी लोकांना आशा आहे. येत्या १० वर्षात लोकसंख्या तीन पटीने वाढणार आहे.