सांगली - सांगलीतल्या वीटा येथे एका चार चाकी गाड़ीतून 22 लाख 85 हजार रूपये ची रोकड़ जप्त करण्याच आलीये. वीटा पोलिसांनी ही कारवाई केलीये.
गाडीतून जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा एक हजार आणि पाचशे रुपयांच्या असल्याचे आढळलेय. नाका बंदी दररम्यान काल रात्री विटा येथील शिवाजी चौक ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोकड आणि निसान कार गाडी जप्त करण्यात आलीये.
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द कऱण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या रोकड जप्त केल्याच्या घटना समोर आल्यात. अनेक ठिकाणी तर या नोटांच्या मोठमोठ्या गोण्या जाळून तसेच गटारात फेकलेल्या आढळल्यात.