१८ वर्षाच्या तरूणाला १९ सेमी लांबींची शेपूट

एका १८ वर्षाच्या तरूणाला १९ सेंटी मीटर लांबीची शेपटी आहे. ही शेपूट आता ऑपरेशनने समूळ काढण्यात येणार आहे.

Updated: Oct 4, 2016, 07:30 PM IST

नागपूर : एका १८ वर्षाच्या तरूणाला १९ सेंटी मीटर लांबीची शेपटी आहे. ही शेपूट आता ऑपरेशनने समूळ काढण्यात येणार आहे. 

स्पायनल कॉडसारख्या नाजूक भागापासून ही शेपटी दूर असल्याने हे शक्य आहे, यापासून या तरूणाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट आहे.

जन्मापासून या तरूणाला असं शेपूट होतं, म्हणूनच पालकांनी त्याचं नाव मारूती ठेवलं, ही बाब त्यांच्याशिवाय कुणालाही माहित नव्हती.

मारूती लहान होता तोपर्यंत ठिक होतं, मात्र त्याला आता या शेपटाचा त्रास होऊ लागला. म्हणून ऑपरेशन करून ही शेपूट काढून घेण्यात येणार आहे.

बाळ गर्भात असताना फॉलिक अॅसिडचं प्रमाण कमी असताना असे प्रकार होतात, असं डॉक्टरांनी म्हटलंय. मात्र आता मारूतीला समाजाने कोणत्याही चेष्टेशिवाय स्वीकारण्याची गरज आहे.