मालवण : सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात बेळगावचे ११ विद्यार्थी बुडालेत. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला असून यात बुडाल्यांमध्ये ६ मुले आणि दोन विद्यार्थीनींचा समावेश आहे. तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. यातील ३ जणांना वाचविण्यात यश आले आहे.
दोन शिक्षकांसह इंजिनिअरिंगचे विद्याथी सहलीसाठी शनिवारी सकाळी मालवणात दाखल झालेत. यावेळी वायरी शिवाजी पुतळ्यानजीक तेली पाणंद येथील समुद्रात काही विद्यार्थी स्नानासाठी समुद्रात उतरलेत. यावेळी काही ग्रामस्थांनी समुद्रात उतरु नका, असा इशारा दिला होता. समुद्र धोकादायक असल्याची माहिती दिली. मात्र, उत्साही तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष करत समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या जीवावर बेतल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्गात पर्यटन करण्यासाठी बेळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे ४७ विद्यार्थ्यांचा ग्रुप मालवण येथे आला होता. फिरण्यासाठी ते वायरी या समुद्र किनारी आले होते. काहीजण पाण्यात खेळत होते. तर काहींही अति उत्साहात स्नानासाठी समुद्रात गेले.यावेळी अचानक आलेल्या लाटेमुळे घाबरेलत. त्यांनी पाण्यातच एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या. त्यामुळे ११ जण बुडालेत. त्यापैकी ८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
एका विद्यार्थिची स्थिती अत्यंत गंभीर जखमी असून तिला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बुडालेल्यांपैकी तीन जणांना स्थानिकांनी स्कूबा डायव्हरच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढले.
- मुजममील हनिकार
- किरण खांडेकर
- आरती चव्हाण
- अवधूत तहसीलदार
- नितीन मुत्नाडकर
- करुणा बेर्डे
- माया कोल्हे
- प्रा. महेश कुजडकर
- संकेत गाडवी
- अनिता हानली
- आकांक्षा घाडगे