विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात

विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला चांगलेच धरेवार धरले.

Updated: Apr 15, 2017, 12:19 PM IST
विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात title=

बुलडाणा : विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला चांगलेच धरेवार धरले.

शेतकरी मरत आहे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नेते मंडळींनी केला. लातूर मधे काल लग्न होत नसल्याने मुलीने केलेल्या आत्महत्ये नंतर तरी सरकारने जागे व्हावे अशी मागणी त्यानी केली, जो पर्यंत कर्ज माफी होत नाही, तो पर्यंत संघर्ष यात्रा सुरु राहणार अस विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले