कोल्हापूर : केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणाहून रोकड जप्त करण्यात आल्याच्या घटना वारंवार घडतायत. कोल्हापूरमध्येही तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीये.
वडगाव-अष्टा मार्गावर पोलिसांनी ही कारवाई केलीये. बोलेरो गाडीतून ही रक्कम नेली जात होती. यावेळी वडगाव शहराच्या हद्दीत पोलिसांच्या नाकाबंदी पथकाने गाडीतून एक कोटी रुपयांच्या 500 आणि 1000च्या नोटा जप्त केल्या.
दरम्यान, याप्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम कोणाची होती तसेच कुठे नेली जात होती याबाबत अधिक तपास सुरु आहे.